अ‍ॅग्रीस्टॅक काय विषय आहे नक्की

Agristack

Agristack

अ‍ॅग्रीस्टॅक काय विषय आहे नक्की

अ‍ॅग्रीस्टॅक म्हणजे काय?

 

अ‍ॅग्रीस्टॅक हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठा बदल घडवण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे . भारतातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीसाठी अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पामुळे उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांना सशक्त करणे आणि कृषी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्प अतिशय महत्वाची भूमिका पार पडणार आहे

 

अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाची वैशिष्ट्ये

 

1. डिजिटल शेतकरी डेटाबेस

अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पात सर्व शेतकऱ्यांची आणि पिकांची माहिती गोळा केली जाणार आहे. या मध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर किती क्षेत्र आहे, त्यांचे सात बारा उतारे, वार्षिक पिकांचं एकंदरीत अहवाल आणि पिकाच्या व्यवस्थापनाची परंपरागत पद्धत या संदर्भात सर्व माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. या संग्रहित माहितीच्या आधारे शासनाजवळ प्रत्येक प्रकारच्या पिकांच्या एकूण उत्पन्नाबद्दलचा एक ढोबळ अंदाज असेल. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या  पिकांना उत्पनाच्या मानाने किती अनुदान आणि इतर सुविधा पुरवायच्या या बद्दल एकंदरीत अंदाज शासनाला लावता येणार आहे. याच माहितीच्या आधारे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या शासकीय योजनांचा डायरेक्ट लाभ होणार आहे.

 

2. डिजिटल पीक निरीक्षण

बऱ्याचदा खात विक्रेते आणि खाजकी कंपन्यांचे विक्रेते शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून गरज नसणारी औषधे आणि खाते पिकांना वापरण्याचा सल्ला देतात आणि माहितीचा अभाव असल्यामुळे शेतकरी सुद्धा याला बळी पडतात. अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमाने उपग्रह इमेजरी आणि IoT सेन्सर्सच्या मदतीने पीक आरोग्य, कीड नियंत्रण आणि पाण्याच्या गरजा वास्तविक वेळेत ट्रॅक करता येतील आणि हि माहिती शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे कुठल्या हि प्रकारे अतिरेकी कीटक नाशकांची फवारणी, खतांचा अति वापर आणि प्रमाणापेक्षा अधिक पाणी या समस्यांमधून शेती आणि शेतकऱ्याची सुटका होईल यात मात्र काही शन्का नाही.

 

3. हवामान आणि पर्यावरण डेटा

अवकाळी पाऊस , अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना नुकसान होते. हवामान आणि पर्जन्याची अचूक माहिती उपलब्ध नसल्या कारणाने लाखोंचे भांडवल आणि मेहनत काडी मोल होऊन जाते. आधुनिक उपग्रह आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना योग्य वेळी हवामान अंदाज व पर्यावरण माहिती उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे पेरणी, काढणी आणि सिंचनाचे नियोजन सुलभ होईल.

 

4. आर्थिक सेवा

डिजिटल शेतकरी डाटाबेस तयार केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याची संपूर्ण माहिती शासनाकडे असणारा हे आणि हीच माहिती शासनाच्या मदतीने संलग्न बँकांनाही पुरवण्यात येईल त्यामुळे  शेतकऱ्यांना कृषी कर्ज, पीक विमा आणि अनुदान मिळवणे सोपे होईल.

 

5. ई-मार्केटप्लेस सुविधा

शेतकऱ्यांना ऑनलाईन बाजारपेठेशी जोडले जाईल, ज्यामुळे उत्पादने थेट खरेदीदारांना विकून त्यांचा नफा वाढेल

 

अ‍ॅग्रीस्टॅकचे शेतकऱ्यांना होणारे फायदे

 

उत्पादकता वाढवणे: डेटावर आधारित उपायांमुळे पाणी, खते आणि कीटकनाशके यांचा योग्य वापर करता येईल.

 

खर्चात कपात: कीड, हवामान बदल आणि अन्य कारणांमुळे होणारे नुकसान कमी करता येईल.

 

सुलभ सेवा: सरकारी योजनांचा लाभ एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सहज घेता येईल.

 

बाजारपेठेत प्रवेश: ऑनलाईन मार्केटमुळे शेतकऱ्यांना चांगल्या किमतीत उत्पादन विकता येईल.

 

अ‍ॅग्रीस्टॅकमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI): पीक पद्धतींचे विश्लेषण करून कीड आणि रोगांची पूर्वसूचना देतो.

 

बिग डेटा: शेतीचा डेटा संकलित करून उपयोगी माहिती पुरवतो.

 

IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज): जमिनीतील सेन्सर, ड्रोन व हवामान उपकरणांसाठी डेटा संकलित करतो.

 

ब्लॉकचेन: आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणतो आणि अनुदान वाटप सुलभ करतो.

 

अ‍ॅग्रीस्टॅक अंमलबजावणीतील अडचणी

 

1. डिजिटल साक्षरतेचा अभाव: अनेक शेतकऱ्यांना डिजिटल साधनांचा वापर कसा करायचा याची माहिती नाही.

 

2. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या: ग्रामीण भागात इंटरनेट पायाभूत सुविधांचा अभाव.

 

3. डेटा सुरक्षा: शेतकऱ्यांच्या वैयक्तिक व जमीन संबंधित माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

 

अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाचे भविष्य

 

अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून भारतीय कृषी क्षेत्रात डिजिटल परिवर्तन शक्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक शाश्वत, लाभदायक आणि सुलभ होऊ शकते.

 

सरकार, खासगी कंपन्या आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाने लाखो ग्रामीण लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता आहे.

 

अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्प हा भारतीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा महत्त्वाचा टप्पा आहे. डेटा व तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी अधिक सक्षम होतील व शेती शाश्वत आणि फायदेशीर व्यवसाय होईल. या लेखात पुरवलेली माहिती हि शासनाची अधिकृत वेबसाईट आणि प्रसारमाध्यमांमधून मिळालेली माहिती मधून मांडण्याचा प्रयतन केलेला हे. अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मदतीने बनवलेल्या वेबसाईट ला भेट द्या.

https://agristack.gov.in/#/

वरील लिंक वर क्लिक करा आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिक माहिती मिळवा, डिजिटल शेतीकडे वाटचाल करा!

 

हा लेख उपयुक्त वाटला का? तुमचे विचार शेअर करा आणि अ‍ॅग्रीस्टॅक प्रकल्पाच्या महत्त्वाबद्दल इतरांना देखील माहिती द्या.

मित्रांसोबत शेअर करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *