तुम्ही योग्य पालक आहात का?

मराठी पालकत्व

तुम्ही योग्य पालक आहात का?

वैवाहिक जीवन हा एक सुंदर ्रवास आहे, जो अनेक टप्प्यांमधू जातो. भारतीय संस्कृतीत, िशेषतः मराठी समाजात, विवाह आणिकुटुंब यांना खूप महत्त्व दिले जाते. या मध्येच पालकत्व एक आनंददायीआणि जबाबदारीचे पर्वआहे .एका नवीन जीवाला जन्म देणे, त्याचेसंगोपन करणे हा महत्त्वपूर्णअनुभव आहे. यात आनंद आहे, प्रेम आहे,जबाबदारी देखील आहे.

प्रत्येक आई वडील, अगदी अशिक्षित, आदिवासी पाड्यातील असोतत्यांना आपल्या मुलांचे उत्तम संगोपन करायचे असते, उत्तम नागरिकबनवायचे असते त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मुलांच्यासंगोपनासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्या खालीलप्रमाणे

1.प्रेम आणि सुरक्षितता:

आई वडीलांचे निस्वार्थप्रेम मुलांसाठीमहत्वाचे ठरते. आईच्या उदरात असल्यापासून मुलांना सुरक्षितता आणिप्रेम जाणवत असते. ईश्वराने तशी रचनाच केलेली असते आणि तेचत्यांना या जगात आल्यावरही हवे असते. ज्या मुलांना घरात प्रेम आणिसुरक्षित वातावरण मिळते, ती मुले अधिक आत्मविश्वासू आणिआनंदीअसतात. त्यामुळे प्रेमळ संवाद आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे खूपमहत्त्वाचे आहे.जे आई वडील आपल्या मुलांशी संवाद साधतात ती मुललवकर बोलायला शिकतात, हे संशोधनात दिसून येते.

2.मार्गदर्शन आणि शिस्त:

मुलांना योग्य वेळी मार्गदर्शन करणेआणि आवश्यकतेनुसार शिस्त लावणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांनाचांगलेवाईटची समज येते आणि ते जबाबदार नागरिक बनण्यास मदतहोते.

3.संवाद:

पालकांनी मुलांशी नियमित आणिमनमोकळा संवाद साधणेआवश्यक आहे. यामुळे त्यांची मते आणिभावना समजून घेण्यास मदतहोते आणिदोघांमधील नाते अधिक घट्ट होते. त्यांच्या दिवसभरातीलगोष्टी जाणून घ्याव्यात, त्यांनाही सांगण्याची सवय लागते. किशोरवयीनमुलांशी नाते घट्ट ठेवण्यास मदत होते.

4.वेळ:

पालकांनी मुलांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.मुले मोठेहोतानाचा वेळ अगदी सहजपणे निघून जातो त्यामुळे त्या वेळेचा आनंदघ्या.मुलांसाठी हजर राहा. त्यांच्यासोबत खेळणे, बोलणे आणि त्यांच्याactivities मध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. यामुळे आपले पालकआपल्यासोबत आहेत याची त्यांना जाणीव होते. मुले पूर्णत: पालकांवरअवलंबून असतात त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जसे वागाल तसेच तेतुमच्याशी लागतील.

5.सकारात्मक उदाहरण:

मुले त्यांच्या पालकांचे अनुकरणकरतात. त्यामुळे पालकांनी चांगले आचरण करणे आणि सकारात्मकदृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला जी मुल्ये तुमच्यामुलांमध्ये असावी असे वाटते ती आधी तुम्ही आचरणात आणा. आजच्यायुगात तुम्ही त्यांच्यासमोर मोबाईल, सोशल मीडिया या साऱ्या गोष्टीकेल्या तर ते ही तसेच करतील.

6.शिस्त आणि मर्यादा:

मुलांना शिस्त लावणं हे दोघांचं कामआहे.ती प्रेमळ आणिसुसंगत असावी. नियम स्पष्ट असावेत. तीपालकांनीही पाळावी. या बाबतीत आई वडीलांनी सुसंगततादाखवावी.अतिकठोर अतिलाड करणं टाळावे.

7.आत्मनिर्भरता:

मुलांना स्वत:ची कामे स्वतः करायला शिकवा. घरसगळ्यांचे आहे आणि त्यामधील कामेही सर्वांची आहे हे त्यांना जाणवूनद्या. यामुळे ते निर्भर राहात नाहीत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.पुढेजेव्हा त्यांना कधी शिकण्यासाठी किंवा इतर कोणत्याही परिस्थितीतएकटे राहावे लागते तेव्हा त्यांची गैरसोय होत नाही.

8.धैर्य सहनशीलता:

पालकांनी सहनशील असणे महत्त्वाचेआहे. प्रत्येक मूल हे वेगळे असते, त्याला सांभाळण्याची प्रकिया वेगळीअसते. ती व्यवस्थित हाताळता यायला हवी. मुलांना वाढवताना तीपडतात, धडपडतात, आजारी पडतात अशा वेळी घाबरता धैर्याने सामोरेजायला हवे. या सोशल मीडियाच्या वातावरणात मुलांना वाढवतानापालकांसमोर अनेक आव्हाने आहेत अशा वेळी संयम ठेवणे आवश्यकआहे.

9.सातत्य:

मुलांच्या संगोपनात सातत्य असणे आवश्यक आहे. नियमआणिअपेक्षांमध्ये वारंवार बदल करणे योग्य नाही.

या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पालकत्वामध्ये महत्त्वाची भूमिकाबजावतात. प्रत्येक मूल वेगळे असते आणित्यांच्या गरजा वेगवेगळ्या असूशकतात, त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांच्या स्वभावानुसार आणिगरजेनुसार योग्य दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.

मित्रांसोबत शेअर करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *