राम  नाईक

Sharad pawar

        शरद पवारांवर गंभीर आरोप

राम  नाईक  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  गेल्या  60 वर्षांपासून  कार्यरत आहेत, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात 1934 साली  त्यांचा  जन्म  झाला.  देशामध्ये  स्वतंत्रेच्या  चळवळीने  ज़ोर पकडलेला असताना आटपाडी  मध्ये  राम  नाईक अभ्यासाचे धडे गिरवत होते शालेयजीवनातच त्यांच्या वर समाजसेवेचे आणि स्वातंत्र्याचे संस्कार घडत होते. उच्च शिक्षण पुण्यामधून प्राप्त केल्यानंतर ते राष्ट्रीय  स्वयंसेवा  संघाच्या  कार्यात  सहभागी  झाले. त्यांची  राजकीय  कारकीर्द बहरली ती  मुंबई  मध्ये. अगोदर  मुंबई  जनसंघाचे  आणि  नंतर  मुंबई भाजपचे  ते प्रमुख  चेहरा  बनले. तीन  वेळा  महाराष्ट्राच्या  विधान  सभेमध्ये  आमदार बनले आणि  पाच  वेळा  मुंबई उत्तर  मतदार  संघातून  खासदार  बनण्याचा  विक्रम  त्यांनी केला त्यानंतर ते केंद्रीय  पेट्रोलियम  मंत्री  झाले, उत्तर  प्रदेशचे  राज्यपाल झाले. चार्यवती  चार्यवती हे त्यांनी लिहिलेले पुस्तक १ हुन अधिक भाषांमध्ये प्रकाशितझालेले आहे. या मधून त्यांच्यातील साहित्यकार जगासमोर आला. कॅन्सर  सारख्या आजारावर  मात करत त्यांनी त्यांच्या जगण्याच्या  दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रमाण दिले. सध्या ते नव्वदी पूर्ण करून ९१ वर्षांमध्ये पदार्पण करतायत. सध्या घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांनी त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगत सध्याच्या आणि पुरवूच्या रकरणावरही उजाळा टाकला

राजकारणात अजूनही कार्यरत  राहण्याबद्दल मत

राकरणात अजूनही कार्यरत राहावा वाटत नाही का असा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते म्हणाले कि  २०१३ ला त्यांनी  स्वतःहून  सांगितलं  कि पाठीमागे तयार झालेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून मी स्वतः निवडणूक लढवणार नाही  मात्र पक्षाच्या समर्थनासाठी ते आजही कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर लगेचच २०१४ ला ते  गोपाळ  शेट्टींचे इलेक्टिव  एजन्ट म्हणून काम सांभाळू लागले आणि आजही पक्षाची अशी बरीच कामकाज ते सांभाळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना प्रबोधन  प्रशिक्षण देणे, गुड  गव्हर्नन्स  सेल चा कार्यभार सांभाळणे अशा गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला.

2004 चा गोविंदा विरुद्ध पराभव

२००४ च्या गोविंदा विरुद्ध पराभवाबद्दल विचारले असता त्यांनी गोविंदा आणि दाऊद संबंधाचा उल्लेख केला. वसई मध्ये सभा घेऊन सोनिया गांधींनी नाईकांना निवडणुकीत पडणे हा इसाई धर्मगुरूंचा आदेश आहे असे सांगितले आणि मतपरिवर्तन केले   sabha,

पेट्रोलियम  मंत्री  असतानाचे  आरोप

पेट्रोलियम मंत्री असताना फक्त भाजप  नेत्यांना आणि संघाच्या लोकांनाच  पेट्रोल  पंप  दिले अशे आरोप त्यांच्यावर झाले होते त्याबद्दल सांगताना ते म्हणाले कि या गोष्टीत काहीही तथ्य  नव्हते  उलट  मनमोहन  सिंघानी एका कॉलेज मधील महिला प्रोफेसर ला पेट्रोल पंप द्यावा म्हणून पाठवलेल्या शिफारस पत्राचा उल्लेकख केला.

मोदी शहांचा पक्ष  आणि तुम्ही  काम  केलेला  पक्ष वेगळा का ?

सध्याच्या भाजप पक्षाबद्दल बोलताना , मोदी शहांचा पक्ष  आणि तुम्ही  काम  केलेला  पक्ष वेगळा का? असा प्रश्न विचारताच ते म्हणाले कि त्यावेळीही आणि आत्ताही पक्षाची कार्यपद्धतीची विचारसरणी एकाच आहे. मोदींच्या व्यक्तमत्व आणि त्यांच्या प्रभावाबद्दल बोलताना ते म्हणाले कि मोदींना व्हिसा साठी एकेकाळी अमेरिकेने  नकार दिला होता आणि आज आपण पाहतोय कि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे त्यांच्याशी जे नम्रतापूर्वक आणि अदर्भावचे व्यवहार आहेत त्याला मोदींचे प्रभावी व्यक्तिमत्वच जवाबदार आहे. आज जगभरात भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मोदींमुळेच बदललेला आहे असाही ते म्हणाले.

सध्याचं राजकारण हे विरोधाचा राजकारण का?

सध्या काँग्रेस पक्ष हा फक्त विरोधाचा राजकारण करत आहे असा त्यांनी मत मांडले. त्यानंतर जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारला कि पूर्वी  भाजप  सुद्धा विरोधाचा  राजकारणं करत नव्हता का ? जसं कि  3g 4g घोटाळ्याच्या आरोपावरून भाजपने  सभागृह कामकाज  बंद  पडला होता  पण  ते आरोप कोर्टामध्ये मात्र सिद्ध नाहीत झाले. यावर उत्तर देत ते म्हणाले कि विरोध फक्त चुकीच्या गोष्टींना होता , चांगल्या  गोष्टींना  नेहमीच पाठिंबा  केला उदाहरणार्थ पाकिस्तान विरोधी युद्धाची भूमिका जेव्हा घेतल्या तेव्हा वाजपेयींनी काँग्रेस सरकारचा कौतुक केला मात्र आता हेच काँग्रेस वाले सर्जिकल स्ट्राईक  चे पुरावे मागतायत, याला म्हणायचं विरोधाचा राजकारण.

सद्दाम  हुसेन  भेट – द्वेषाचा  राजकारण

सद्दाम हुसेन भेटीबद्दल जेव्हा आठवण करून देताना विचारलं तेव्हा ते म्हणाले कि , जेव्हा सद्दाम हुसीं याना भेटायला गेले तेव्हा जे कार्पेट होते त्यावर जॉर्ज बुश यांचा फोटो होता म्हणजे इतपत द्वेषाचा राजकारण त्यांनी पाहिलंय.मग आता महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती पाहता आपल्याकडे द्वेषाचा राजकारण आहे का ? असा विचारलं असता ते शरद पवारांवर गंभीर आरोप करत म्हणाले कि महाराष्ट्रात द्वेषाचा राजकारण पसरावणरे शरद पवार आहेत आणि त्याला बाली पडलेत ते म्हणजे उद्धव ठाकरे.

 

शरद पवारांवर मत

शरद  पवारांनी नेहमी सत्तेचं राजकारण केला आणि आपली पोळी भाजण्याचाच नेहमी प्रयत्न केला. याचा उदाहरण देताना महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याच्या अगोदर पवार हे आपण विरोधी पक्ष म्हणून काम करू म्हणाले मात्र त्यांनी तास नाही केला असं ते म्हणाले. बाकी शरद  पवारांशी  नातं  चांगलं आहे कारण  एकाच कॉलेज मध्ये शिकलेलो आहोत असं तेते म्हणाले.

राजकीय कारकिर्दीमधल्या अभिमानास्पद गोष्टी

शाळा आणि राष्ट्रगीत मुद्दा

त्यांच्या कारकिर्दीमध्ये सभागृहात असा मुद्दा उठला कि काही सरकारी शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जात नाही यावर काय उपाय? तेव्हा त्यांनी विचार मांडले कि आपण सभागृहामध्ये तरी कुठे राष्ट्रगीत म्हणतो , जर सक्ती करायचीच असेल तर सुरवात हि सभागृहापासूनच करायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी सुचवलं कि सभागृहात सुरवातीला वंदेमातरम आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणू हा ठराव मंजूर जाला मात्र मुस्लिम लीग चे नेते बनत वाला यांनी या गोष्टीला विरोध केला त्यामुळे अगोदर राष्ट्रगीत आणि नंतर वंदे मातरम म्हणण्याची सक्ती झाली. म्हणून आजही शाळांमध्ये सकाळी राष्ट्रगीत आणि संध्याकाळी वंदेमातरम म्हटलं जात.

बोंबेच – मुंबई नामांतरण

बोंबेचे मुंबई नामंत्रण हे माझ्या कारकिर्दीतला दुसरे अभिमानास्पद काम आहे असा राम नाईक म्हणाले. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले कि सभागृहामध्ये जेव्हा त्यांनी मुद्दा मंडल कि बोंबे ना म्हणता मुंबई म्हटले पाहिजे तेव्हा अध्यक्षानी प्रश्न केला कि ते फक्त क्षाराचे नाव आहे काय फरक पडतो बोंबे म्हणू किंवा मुंबई. त्या वर राम नाईकांनी मत मांडले कि या या शहराला जे काही नाव मिळालाय त्याला एक इतिहास आहे या शहरातील दैवत मुंबादेवीच्या नावावरून हे नाव देण्यात आलेला आहे त्यामुळे त्याचा चुकीचा उच्चर होणे म्हणझे श्रद्धेचा अपमान आहे. १८८९ ला सुरु झालेला हा प्रस्ताव शेवटी राम नाईकांच्या पाठपुरवट्यामुळे १९९५ साली केंद्र सरकार ने मंजूर केला आणि आज सरकारी नियमानुसार बोंबेचा मुंबई झालेला आपल्याला पाहायला मिळत.

प्रोमोशन ऑफ ब्रेस्ट मिल्क

त्या काली पावडर च्या दुधाच्या जाहिरातीकरणामुळे लहान मुलांना आईचा दूध देण्याची प्रथा कुठेतरी डगमगायला लागली होती. आणि हो  संघटनेने सांगितल्यानुसार मतांचा दूध हेच बालकांच्या पोषणासाठी महत्वाचा आहे हे सिद्ध जाला होता त्यामुळे राम नाईकांनी पावडरच्या दुधाच्या जाहिरातीवर अंडी आणून लहान मुलांसाठी आईचा दूध हेच महत्वाचा असा प्रस्ताव मांडणारा परिवते बिल सादत केला आणि भारताच्या इतिहासातील हे पहिलाच परिवते बिल होता जे बिनविरोध मंजूर झालं.

मित्रांसोबत शेअर करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *