राम रक्षा स्तोत्र महिमा मराठीमधे
राम रक्षा स्तोत्र महिमा मराठीमधे
राम रक्षा स्तोत्र महिमा मराठीमधे. श्रीरामरक्षा स्तोत्राचे श्रद्धापूर्ण भावनेने नियमित पठाण केल्यास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, आत्मिक शांती, समाधान, संपत्ती, सद्बुद्धी आणि सर्व चांगल्या मनोकामनांची पूर्ती होते.
सार्थ श्रीरामरक्षा
श्री गणेशायनमः अस्याश्रीरामरक्षास्तोत्र मंत्रस्य | बुधकौशिकऋषि: |श्रीसीतारामचंद्रो देवता |अनुष्टुप छंद: |सीता शक्ती : | श्रीमद्धनुमान कीलकम | श्रीरामचंद्राप्रीत्यर्थे जपे विनियोग: |अथ ध्यानम | ध्यायेदानुबाहुं धृतशराधनुषं बद्धपद्मासनस्थं | पीतं वसो वासानं | नवकमलादलस्पर्धीनेत्रं प्रसन्नम | वामांडारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं | नानालाडरदीपतं दधतमुरुजटामंडानं रामचंन्द्रम || इतिध्यानम |
श्रीसीतारामचंद्र प्रभु ज्यांचे हाथ गुडघ्यआपर्यंत लांब आहेत. ज्यांनी धनुष्यबान धारण केला आहे. जे पिवळ्या रंगाचे वस्त्र पितांबर परिधान करून पद्मासनामधे बसलेले आहेत. ज्यांचे डोळे कामळाच्या पाकळी पेक्षाही जास्त मन मोहक आहेत. मेघाप्रमाणे (श्यामरंगी) कांती असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावर अद्वितीय प्रसन्नता आहे. ज्यांचा चेहरा कमळाच्या फुलापेक्षी जास्त सुरेख आहे. बघताक्षणी मोहून घेणारे डोळे असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या डाव्या मांडीवर जगत माता सीता बसलेल्या आहेत अशी चैतन्य निर्माण करणारी ध्यान धरण आपण प्रथम करावी. आणि मनोभावाने श्रीरामरक्षा स्तोत्राला सुरवात करावी.
चरित्रं रघुनाथस्य शतकोटीप्रविस्तरम | एकैकमक्षरं पुंसां महापटकनाशनम ||१||
अर्थ : श्रीरघुनाथांचे चरित्र शंभर कोटी श्लोक जपामधून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक महान आहे. त्यातील एक एका अक्षरामध्येसुद्धा मोठमोठ्या पापांचा नाश करून, मोक्ष मिळवून देणाऱ्या सदमार्गावरती चालण्यास प्राणिमात्रांना सामर्थ्य देणारे आहे.
ध्यत्वा नीलोप्तश्यामं रामं राजीवलोचनम | जानकिलक्ष्मनोपेतं जटामुकुटमंदीतम ||२||
सासीतूण धनुर्बाणपाणी | नतकचारांतकम | स्वलीलया जगत त्रlतु माविर्भूतमजं विभुम ||३||
रामरक्षामं पठेत प्राज्ञ: पापघनी सर्वकामदाम | शिरो मे राघवः पटू भलं दशरथात्मजः ||४||
अर्थ : निळ्या कमळाप्रमाणे ज्यांचा रंग सावळा आहे, ज्यांचे कमळाच्या फुलाप्रमाणे मुलायम आहेत. जगत माता सीता आणि लक्ष्मण ज्यांच्या सोबत आहेत. जे जटारुपी मुकुटांनी सुशोबित आहेत, ज्यांच्या हातामध्ये भाता व धनुष्यबाण आहे, जे काळरात्री फिरणाऱ्या राक्षसांचा नाश करणारे आहेत. जे जन्म रहित आहेत, सर्वव्यापी आहेत, जे जगत रक्षणासाठी स्वतःच्या लीलेने पत्रकात झालेले आहेत. अशा प्रभू श्री रामाचें ध्यान करून पापांचा नाश करणाऱ्या, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या श्रीरामरक्षेचे सर्व मनुष्यगणांनी पठाण करावे. रघुकुलात जन्मलेले दशरदपुत्र प्रभू श्रीरामचंद्र माज्या कपाळाचे रक्षण करोत हि प्रार्थना.
कौसल्येयो दृशौ पातु विश्वमित्रप्रियः श्रुती |
घ्राणम पातु मुखत्राता मुखं सौमित्रवत्सल: ||५||
कौशल्याराणीचा पुत्र माज्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करणारा माज्या नाकाचे रक्षण करो. सुमित्रापुत्र श्री लक्ष्मणांवर प्रेम करणारा श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो अशी प्रार्थना मी मनोभावे करतो.
जिव्हां विध्यानिधी: पातु कणठम भारतवंदीतः |
स्कनधौ दिव्ययुधः पातु भुजौ भगणेशकार्मुक: ||६||
अर्थ : अखंड विध्येचा साठा असणारे प्रभू श्रीरामचंद्र, अयोद्धेयचा राज्यकारभार सांबाळलेल्या भरात राजा ज्यांच्यासमोर नतमस्तक झाले, अशे दिव्यावन प्रभू श्रीरामचंद्र माझ्या माझ्या जिभेचे माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्या अशा शास्त्र अस्त्रांचे धारण करणारे रघुपति राघव राजा राम ज्यांनी देवाधी देव महादेवांचा अतूट धनुष्य मोडला, अशे शक्तिवान प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही खांद्यांचे, माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करोत हि मनोभावे प्रार्थना मी करतो.
करौ सीतापतिं: पातु हृदयं जामदग्न्ययाजित|
मध्यं पातु खरध्वंसी नाभीं जाम्बवदाश्रय: ||७||
अर्थ: जगत जणांनी माता सीता पती रघुपति राघव राजा राम माझ्या दोन्ही हातांचर रक्षण करोत. जमदग्नी पुत्र म्हणजेच महापराक्रमी प्रभू श्री परशुरामांना जिंकणारे प्रभू श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो हि प्रार्थना मी मनोभावे करतो. भयावह अशा खर राक्षसाचा वाढ करणारे शूरवीर प्रभू श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागावंगे रक्षण करो, जामवंतांच्या मदतीस धावून जाणारे प्रभू श्रीराम माझ्या बेंबीचे रक्षण करो हि प्रार्थना मी मनोभावे करतो.
सुग्रीवेश: कटी पातु | सकथिनी हनुमंतप्रभू: |
उरु रघूत्तम: पातु रक्ष:कुल विनाशकृत ||८||
अर्थ: राजा सुग्रीवाचे स्वामी , महाबली हनुमंताचे प्रभु, रघुपति राघव राजा राम माझ्या कमरेचे, माझ्या जांघांचे रक्षण करोत अशी प्रार्थना मी मनोभावे करतो. राक्षस कुळांचा नॅश करणारे महापराक्रमी रघुकुल श्रेष्ठ राघव माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करोत अशी प्रार्थना मी करतो.
जाणुनी सेतुकृत पातु जेण्डघ्न दशमुखांतकः | पादौ बिभीषणश्रीद : पातु रामोsखिलं वपुः ||९||
अर्थ : महाकाय समुद्रावर सेतु बंधन घडवणारे, दंशानंद रावणाचा अंत करणारे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही गुढ्यांचे आणि माझ्या दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण करोत हि प्रार्थना मी करतो. बिभीषणांना सुवर्ण लंकेचा राजपथ सुपूर्त करणारे दाता प्रभू श्रीरामचंद्र माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करोत, असे दयावान प्रभू श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे,मनाचे आणि आत्म्याचे रक्षण करोत अशी मनोभावे प्रार्थना मी करतो.
…………………………सियावर प्रभू रामचंद्र कि जय, जय श्री राम जय जय श्री राम………………………………………….
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पेठेत | स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत ||१०||
अर्थ : अशाप्रकारे परब्रह्म प्रभू श्रीरामाच्या सामर्थ्याने युक्त अश्या श्रीरामरक्षेचे जे कोणी मनोभावे पठाण करतील त्यांना दीर्घायुष्याची ओराप्ती होईल, पुत्रवान होतील, त्यांना सर्व क्षेत्रात यशप्राप्ती होईल, प्रभू आशीर्वाद असणारी संतती प्राप्त होईल.
पाताळभुतल व्योम चारीणशछज्ञचारीण: | न द्रष्टुमपी शाक्तास्ते राक्षितं रामनामभि: ||११||
अर्थ: प्रभू श्रीरामांच्या नामाच्या छत्रछायेखाली आलेल्या मनुष्यांकडे पातळ, भूमी आणि आकाशात संचार करणारे कपटी आचरणाचे लोक दृष्टी सुद्धा टाकू शकत नाहीत. रामनामाची ढाल बनवून आपण या सर्व वाईट शक्तींपासून सुरक्षित राहू शकतो, नव्हे सामर्थ्य फक्त राम नामात आहे.
रामेती रामभद्रेति रामचंद्रेंती वा स्मरन | नरो न लिप्यते पापै भृक्तिं मुक्तीं च विंदती ||१२||
अर्थ: प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाचे स्मरण करणारे, राम राम म्हणणारे अथवा रामभद्र , रामचंद्र नामाचे स्मरण करणाऱ्या कोणत्याही प्रकारचे पाप स्पृहा देखील करत नाही, अशा लोकांना सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते. रामनामाच्या स्मरणाने मोक्ष प्राप्ती होते.
जगज्जेत्रैकंनत्रेण रामनाम्नाभिरक्षितम | य:कंठे धारयत्तस्य करस्था: सर्व सिध्दय: ||१३||
संपूर्ण जगाला जिंकून घेण्याच्या सामर्थ्य असलेल्या राम जपणे मंतरलेला टेट जेकोणी गळ्यात घालतील त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. अशा प्रकारे घनघोर तपस्या करून मिळणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य राम नामात आहे.
वज्रपजरनामेदम यो रामकवचं स्मरत | अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंडलं||१४||
इंद्रदेवांच्या वज्रस्त्राप्रमाणे महामजबूत अशा श्री रामरक्षा कवचाचे जे कोणी स्मरण करतील अशा सर्व लोकांना सर्व ठिकाणी विजय व मंगल प्राप्त होतो.
आदिष्ठावान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हार: || तथा लिखितवान प्रात प्रबुधो बुधकौशिक: ||१५||
बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन स्वयं भगवान शिव शंकरांनी श्री रामरक्षा सांगितली. संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी तीच रामरक्षा सकाळी उठल्याबारोबर बुधकौशिक ऋषींनी लिहिली आणि जगद कल्याणासाठी प्रसारित केली.
अराम: कल्पवृक्षाणा विराम: सकलापदाम | अभिरामस्त्रिलोकानं राम: श्रीमान स न: प्रभु: ||१६||
सर्व इच्छांची पूर्ती करणाऱ्या कल्पवृक्षाच्या बगीच्या सामान प्रभु रामचंद्र आहेत. सर्वप्रकारच्या संकटाना भक्तांपासून दूर ठेवणारे त्रिभुवनाला आनंद प्रदान करणारे असे वैभवसंपन्न रघुपति राघव राजा राम आमचे प्रभु आहेत.
तरूनौ रूपसंपनौ सुकुमारौ महाबलौ | पुंडरिकाविशालाक्षौ चिरकृष्णाजिनम्बरौ ||१७||
फलमुलाशीनौ दानतौ तापसौ ब्रह्मचारीनौ | पुत्रौ दशरथस्यंतो भ्रातरौ रामलाक्षमनौ||१८||
शरणयौ सर्वस्तवानं श्रेष्टौ सर्वधनुष्यातम| रक्ष: कुलनिहनतारौ त्रा ये तं नौ रघूत्तमौ||१९||
अर्थ : वस्त्र म्हणून वल्कल आणि कृष्णाजिन म्हणजेच काळवीटाचे कातडे धरण करणारे, फळे आणि कंदमुळे भजन म्हणून खाणारे, तरुण अत्यंत बलवान आणि रूपवान कमळाच्या फुलाप्रमाणे डोळे असणारे, सर्व इंद्रियांवर ताबा ठेवत तप करणारे, ब्रह्मचर्याचे पालन करणारे, सर्व प्राणिमात्रांवर कृपा करणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ असणारे, राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे,रघुकुलशरष्ठ असे राजा दशरथांचे महापराक्रमी असे दोनी पुत्र प्रभू श्री राम आणि लक्ष्मण हे दोन्ही भाऊ आमचे सर्व संकटातून रक्षण करोत अशी प्रार्थना मी करतो.
……………..प्रभू रामचंद्र कि जय प्रभू लक्ष्मण कि जय प्रभू रामचंद्र कि जय प्रभू लक्ष्मण कि जय जय श्रीराम ……………….
आत्तसज्य धनुष्याविषुस्पृशावक्षया शुगनिषगसगनौ | रक्षणाचे मम रामलक्ष्मणावग्रत : पाठी सदैव गच्छतम् ||२०||
अर्थ: सुसज्ज धनुष्य असणारे, कधीही समाप्त ना होणाऱ्या बाणांचे भाते जवळ असणारे आणि समाजरक्षणासाठी सदैव बाणांना स्पर्श करणारे प्रभू राम-लक्ष्मण प्रत्येक मार्गावरती माझे रक्षण करण्यासाठी सदैव धावून येवोत अशी मी प्रार्थना करतो.
संणध: कवीची खडगी चापबाणधरो युवा| गच्छं मनोरथोSस्माकं राम: पटू स लक्ष्मण: ||२१||
अर्थ: धनुष्यबाण आणि खड्ग घेऊन आणि चिल्काताप्रमाणे सुरक्षा कवच असलेले, लस्कमानांसोबत असणारे साक्षात आमचे मनोरथ प्रभू श्रीराम आमचे रक्षण करवत अशी प्रार्थना मी करतो.
रामो दाशरथी: शूरो लक्ष्मणचरो बली| ककुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघूत्तम: ||२२||
वेतान्तवेध्यो यज्ञेश : पुराणपुरुषोत्तम 😐 जानकीवल्लभम श्रीमान प्रमेयापराक्रम :||२३||
इत्येतानी जपम नित्यं मद्भक्त : श्रद्धयान्वित : | अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशय : ||२४||
अर्थ: परमानंदाची अनुभूती करून देणारे दशरथ पुत्र जे शूर, सामर्थ्यसंपन्न पूर्णब्रह्म आहेत ज्यांचा काकुस्थ कुळात जन्म जाला आहे अशे प्रभू रामचंद्र ज्यांच्या मार्गावरती प्रभू लक्ष्मण चाललात आहेत. सीतापती,कौशल्यपुत्र, सर्व यज्ञांचे स्वामी, रघुकुलश्रेष्ठ, पुरातन पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे महापुरुष, महापराक्रमी,वैभवसंपन्न रघुपति राघव राजा राम अशा नावांचा श्रद्धापूर्वक जप करणारा भक्त अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त पुण्य कमावतो यात शंका नाही.
रामं दुर्वादाविषयामम पद्माक्षम पितावाससम | स्तुवणी नामाभिर्दिवैर्ण ते संसारींनो नर: ||२५||
अर्थ: दुर्वांच्या पानाप्रमाणे सावळा रंग असणाऱ्या, पितांबर धारण करणाऱ्या आणि कमळाप्रमाणे सुंदर डोळे असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या दिव्या नावांची जे कोणी स्तुती करतात अशे सर्व लोक संसारमायेतून सुटतात.
रामं लक्ष्मणपूर्वजम रघुवरम सीतापती सुंदरम |
ककुत्स्थम करुणार्ण गुणविधीन विप्रप्रियं धार्मिकम |
राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयम श्यामलं शान्तमुर्ती |
वंदे लोकाभिरामं रघुकुलतिरकम राघवम रावणारीम ||२६||
अर्थ:लक्ष्मणाचा मोठा भाऊ, रघुकुलश्रेष्ठ, सीतापती, सुंदर,ककुत्स्थकुळात जन्माला आलेले, करुणेचा सागर असणारे, सद्गुणांचा साथ असणारे, ज्ञानी सद्गुणी ज्यांना प्रिय आहेत असे धार्मिक , राजश्रेष्ठ, सत्यप्रतिज्ञ राजा दशरथांचे पुत्ररत्न, सवाल रंग आणि अतिशय शांतीस्वरूप असणारे, लोकांना आनंद देणाऱेरघुकुलाच्या मस्तच भूषण वाढवणाऱ्या तिलकाप्रमाणे असणारे आणि दृष्ठ रावणाचा वाढ करणारे रघुकुलश्रेष्ठ प्रभू श्री रामाला मी मनोभावे वंदन करतो.
रामय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथया नाथाय सीताय: पतये नम: ||२७||
अर्थ: रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, या सृष्ठीच्या निर्मात्याला, सर्वांचा नाथ रघुनाथाला, सीतापती प्रभू रामचंद्रांना माझा साष्टांग नमस्कार.
श्रीराम राम रघुनंदन राम राम | श्रीराम राम भारताग्रज राम राम |
श्रीराम राम रणकर्कश राम राम | श्रीराम शरणं भव राम राम ||२८||
अर्थ : हे प्रभू श्रीराम ! हे श्रीराम ! रघुकुलपुत्र श्रीराम ! भारताच्या श्रेष्ठ बंधू प्रभू श्रीराम ! रणांगणात कणखरपणे शत्रूशी लढणाऱ्या प्रभू श्रीराम ! हे श्रीराम ! हे रामा ! तू आमचा रक्षण कर्ता हो !
श्रीरामचंद्राचरणौ मणसा स्मरामी | श्रीरामचंद्राचरणौ वचसा गृनामी | श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि | श्रीरामचंद्राचरणौ शरणं प्रपध्ये ||२९||
अर्थ: मी मनोभावे प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणांचे स्मरण करतो, मी श्रीरामचंद्र प्रव्ह्यूच्या पाऊलांचे बोलून स्तवन करतो, मी प्रभू श्रीरामचंद्राच्या पायांवर डोके टेकवून स्वतःला प्रभू श्रीरामचंद्रांना समर्पित करतो, मी प्रभू श्रीरामाच्या चरणात शरण जातो.
माता रामो मातापिता रामचंद्र: || स्वामी राम मत्सखा रामचंद्र: | सर्वस्वम मे रामचंद्रो दयाळूर्नण्यम जाने नैव जाणे न जाने ||३||
प्रभू श्रीराम मे आई आहेत प्रभू श्रीराम माझे वडील आहेत, तेच माझे प्रभू श्रीरामाचा माझे मित्र एवढेच काय तर माझे सर्वस्व सुद्धा प्रभू श्रीरामाचा आहेत. बाकी सर्वस्व मी त्यांच्यातच पाहतो.
दक्षिणे लक्षामाणो यस्य विमे तू जनकात्मजा | पुरतो मारुतीर्यस्य तं वंदे राघुनंदनं||३१||
अर्थ: ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आणि डाव्या बाजूला जनक कन्या माता सीता आहेत व ज्यांच्या पुढे मारुती आहेत अशा त्या रघुकुलाला आनंद देणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांना मी वंदन करतो.
लोकाभिरामं रनारांधिरं राजीवनेत्रं रघूवंशनाथम | कारुण्यरूपं करुणाकरम तं श्रीरामचंद्र शरणं प्रपध्ये ||३२||
अर्थ: लोकांना आनंद देणाऱ्या, रणांगणात धैर्यशीलता दाखवणारे, कमळाप्रमाणे डोळे असणाऱ्या , रघुकुलाचे अधिपती आणि साक्षात करुणेची आणि मायेची मूर्ती असणाऱ्या दयेच्या सागराला म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांना मी शरण आलो आहे.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमंतां वरिष्ठम | वतात्मजम वनरयुथमुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपध्ये ||३३||
अर्थ: मनाच्या वेगापेक्षाही अधिक गतिवान असणाऱ्या, वाऱ्यासारख्या वेगवान, बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ , वनरसामुदायाचे मुख्य अशे वायुपुत्र, प्रभू श्रीरामांचे परम भक्त, श्रीराम दूत प्रभू मारुतीरायाला मी शरण आलो आहे.
कुजनतं रामरामेती मधुरं मधुराक्षरं | आरुध्य कविताशाखां वंदे वाल्मिकी कोकिलम ||३४|
अर्थ: कवितेच्या फांदीवर बसून राम राम अशा गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मिकीरुपी कोकिळेस मी वंदन करतो.
अपादामपहरतारं दातारं सर्वसंपदं लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहं ||३५||
अर्थ: सर्व प्रकारच्या संकटांचे हरण करणारे, सर्वप्रकारची संपत्ती आणि सर्व लोकांना आनंद देणारे प्रभू श्री रामचंद्रांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
भर्जन्म भावबीजणांमर्जन्म सुखसंपदं | तर्जन्म यमदूतानं रामरामेती गर्जनम ||३६||
अर्थ: राम राम अशी गर्जना हि संसाराची बीजे भाजून टाकणारी , सुख संपत्तीची प्राप्ती करणारी आणि यमाच्या दूतांना भीती उत्पन्न करणारी आहेत.
रामो राजमणी : सदा विजयतेका रामं रमेश भजे रमेनभीहता निशाचरचमू रामय तस्मेय नमः: | रामनास्ति पारायणं परतरं रामस्य दासोSसम्यहं | रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ||३७||
अर्थ: राजश्रेष्ठ प्रभू श्रीराम नेहमी विजयी होतात.सीतापती रामास मी पुजतो. राक्षसी सेनेचा सर्वनाश करणाऱ्या प्रभू श्रीरामांना माझा साष्ठांग नमस्कार असो. प्रभू श्रीरामांव्यतिरिक्त माझ्यासाठी दुसरे कोणी श्रेष्ठ नाहीत, मी प्रभू श्री रामाचा सेवक आहे. माझ्या चित्तवृत्ती नेहमी प्रभू श्रीरामांच्या ठिकाणी विलीन होवोत. हे प्रभू श्रीराम तुम्ही माझा उध्दार करा अशी मी प्रार्थना करतो.
रामरमॊती रामेती रमे रामे मनोरमे | सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वराणने ||३८||
अर्थ: हे राम , हे राम, हे राम अशा उच्चाराने मी प्रभू श्रीरामांच्याठिकाणी रमून जातो. रामाचे एक नाव विष्णूंच्या हजारणामांच्या बरोबर आहे.
इति श्री बुधकौशिकविरचित श्रीरामरक्षा – स्तोत्रं संपुर्णम |
|| श्रीसीता रामचंद्रअर्पणमस्तु ||
अर्थ: अशाप्रकारे श्रीबुधकौशिकऋषींनी लिहिलेले श्रीरामरक्षास्तोत्र पूर्ण झाले हे माता सीता आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पित असो.
श्रीराम आरती
संसारसंगे बहू शिणलों मी | कृपा करी रे रघूराजस्वामी | प्रारब्ध माहे सहसा टळेना | तुजविण रामा मजा कंठवेना | ||१||
मन हे विकारी स्थिरता ना ये रे | त्याचेनि सांगे भ्रमंती भले रे | अपूर्व कार्य मन हे विटेना | तुजविण रामा मजा कंठवेना ||२||
मायाप्रपंचीं बहू गुंतलोरे | विशाल व्याधींमध्ये बांधली रे | देहाभिमान अति राहवेना | तुजविण रामा मज कंठवेना ||३||
दारिद्र्य दुखी बहू कष्टलो मी | संसार मायेतांचि गुंतलो मी | संचित मजला माझे कळेना | तुजविण रामा मज कंठवेना ||५||
लक्ष्मीविलास बहू सौख्य वाटे | श्रीराम ध्याता मणी कष्ट मोठे प्रपंच वार्ता वादात विटेना | तुजविण रामा मज कंठवेना ||५||
अहोरात्र धंदा करीत पुरेना | प्रारब्ध योगे मज राहवेना | भवदुःख माझे कढीहू टळेना | तुज़वीं रामा मज कंठवेना ||६||
तीर्थासी जात बहू दुःख वाटे | विषयांतर राहुनी सौख्य वाटे | स्वहित माझे मजला कळेना | तुजविण रामा मज कंठवेना ||७||
मजला अनाथ प्रभू तूच डेटा | मी मूढ कि जण असेच आता | दास मणी अथवा विसरेना तुजविण रामा मज कंठवेना ||8||
श्रीरामाचे भजन
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम | जानकी जीवन रामनाम सुंदर माधव मेघश्याम ||१||
पतितपावन रामा | जय जय पावन रामा ||२|| जय जय राम राम | सीताराम राम राम ||३||