SBI Clerk भरती 2024

SBI Clerk भरती 2024  संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया

SBI clerk recruitment 2024

SBI clerk recruitment 2024

SBI Clerk 2024 परीक्षा

भारतीय स्टेट बँकेने (SBI) क्लर्क (ज्युनियर असोसिएट) पदांसाठी 14191 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे. SBI Clerk परीक्षा ही देशभरातील बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून, अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 आहे.SBI Clerk परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते – प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा. उमेदवारांना दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवणे आवश्यक आहे. हि परीक्षा एक प्रतिष्ठित परीक्षा म्हणून गृहीत धरली जाते आणि प्रत्येक वर्षी देशभरातून लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज भारतात.

महत्त्वाच्या तारखा

SBI क्लार्क २०२४ परीक्षेसाठी महत्वाच्या तारखा
प्रोसेस तारीख लडाख  भागासाठी  तारीख
SBI क्लार्क  नोटिफिकेशन  २०२४ १६  डिसेंबर  २०२४ ६  डिसेंबर  २०२४
ओंलीने  अँप्लिकेशन  सुरवात १७  डिसेंबर  २०२४ ७  डिसेंबर  २०२४
ओंलीने  अँप्लिकेशन  शेवट ७  जानेवारी  २०२५ २७  डिसेंबर  २०२४
SBI क्लार्क  पूर्व परीक्षेची तारीख  २०२४ फेब्रुवारी  २०२५ जानेवारी  २०२५
SBI क्लार्क  मुख्य  परीक्षेची तारीख  २०२४ मार्च /एप्रिल   २०२५ फेब्रुवारी  २०२५

 

SBI Clerk भरतीतील जागा

भारतीय स्टेट बँकेने एकूण 14191 पदे जाहीर केली आहेत. यामध्ये 13735 नियमित पदे आणि 456 बॅकलॉग जागांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

या परीक्षेसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवाराचे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीचे ( अंडर ग्र्याजुवेट) शिक्षण पूर्ण झालेले असले पाहिजे

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, मात्र त्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत पदवी पूर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा (1 एप्रिल 2024 रोजी)

या परीक्षेसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवाराचे वयोमर्यादा खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

किमान वय: 20 वर्षे

कमाल वय: 28 वर्षे

वयोमर्यादेत SC/ST, OBC, PWD यांना शासन नियमांनुसार सवलत दिली जाईल.

परीक्षा पद्धत

SBI Clerk भरतीसाठी 2 टप्प्यांमध्ये परीक्षा घेतली जाईल:

1. प्रिलिम्स परीक्षा (Prelims):

| विभाग                        | प्रश्नांची संख्या | गुण       | वेळ         |

| इंग्रजी भाषा                 | 30               | 30        | 20 मिनिटे |

| संख्यात्मक अभियोग्यता | ३५               | 35        | 20 मिनिटे |

| तर्कशक्ती                    | ३५              | 35        | 20 मिनिटे |

| एकूण                         | १००             | 100      | 60 मिनिटे |

2. मुख्य परीक्षा (Mains):

मुख्य परीक्षेत संख्यात्मक अभियोग्यता, तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, आणि संगणकीय ज्ञान यांचा समावेश असेल.

परीक्षेची निवड प्रक्रिया

पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची या पदासाठी निवड करण्यात येईल. च्या प्रशिक्षित अप्रेन्टिस असणाऱ्या अर्जदारांना मुख्य परीक्षेमध्ये २.५% गुण वाढवून दिले जातील

महत्वाची सूचना : या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना इंटर सर्कल ट्रान्सफर किंवा इंटर स्टेट ट्रान्सफर ची सुविधा उपलब्ध नाही. कोणत्याही परिस्तितीमध्ये या नियमावलीमध्ये बदल होणार नाही याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

SBI Clerk 2024 साठी अर्ज कसा करावा?

या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ डिसेंबर २०२४ पासून सुरु झालेली असून हि मर्यादा ७ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे.

1. SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://sbi.co.in/web/careers

2. “SBI Clerk Recruitment 2024” लिंकवर क्लिक करा.

3. तुमची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

4. अर्ज शुल्क भरा:

परीक्षा आयोगाने प्रसारित केलेल्या अधिसूचनेनुसार परीक्षेसाठी शुल्क खालील प्रमाणे आकारण्यात येणार आहे

सामान्य/OBC/EWS: ₹750

SC/ST/PWD: शुल्क नाही

5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढा.

सूचना : परीक्षा शुल्क एकदा जमा केल्यास कुठल्याही कारणास्तव ते माघारी मिळणार नाही याची अर्जदारांनी निंद्य घ्यावी. परीक्षा शुल्क हे फाटा आणि फक्त ऑनलाईन पेमेंट्स च्या माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहे.

पगार व फायदे

SBI Clerk पदासाठी प्रारंभिक पगार सुमारे ₹46,000/- असेल. यामध्ये विविध भत्ते आणि प्रमोशन संधी मिळतात. याच सोबत नियुक्त लोकांना बँकेच्या खासगी कर्जाच्या संबंधातील योजनांचा लाभ मिळू शकतो. हेल्थ इन्शुरन्स चा हि फायदा या कर्मचाऱ्यांना बँकेकडून मिळतो. SBI हि एक नामांकित आणि पूर्ण भारतामध्ये मनाली जाणारी बँक असल्यामुळे या पदासाठी नियुक्ती होणे म्हणचे सामाजिक प्रतिष्ठेचे मानले जाते

तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स

1. अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करा: प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या.

2. मॉक टेस्ट द्या: जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवून सराव करा.

3. वेळेचे व्यवस्थापन: प्रत्येक विभागासाठी वेळ निश्चित करा.

4. सर्व विषयांचा अभ्यास करा: इंग्रजी, गणित आणि तर्कशक्तीवर विशेष लक्ष द्या

SBI Clerk भरती 2024 ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची उत्कृष्ट संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी योग्य वेळेत अर्ज भरून तयारीला लागावे. अधिकृत माहिती आणि अर्जासाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करा आणि यशस्वी व्हा!

सूचना : या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती हि ऑफिसिअल वेबसाईटवर पुरवलेल्या अधिसूचनांवर आधारित आहे. या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती  मराठी वाचकांना अधिक सोप्या पद्धतीने समजेल या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपडेटेड माहिती आणि नवीन बदलांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी SBIच्या ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्या 

मित्रांसोबत शेअर करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *